Jasprit Bumrah No. 1 Test Bowler: भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) इंग्लंडविरुद्धच्या उत्कृष्ट गोलंदाजीचा फायदा झाला आहे. आता जसप्रीत बुमराह कसोटीत जगातील नंबर वन गोलंदाज बनला आहे. सध्या त्याचे 881 गुण आहेत. बुमराहने इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहने पहिल्या डावात 6 विकेट घेतल्या. तर दुसऱ्या डावातही बुमराहने 3 फलंदाजांना बाद केले होते. बुमराहला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.  बुमराह तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल ठरणारा जगातील पहिला गोलंदाज आहे. (हे देखील वाचा: WTC Point Table Update: दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे भारताचे मोठे नुकसान, न्यूझीलंडने पॉइंट टेबलमध्ये घेतली मोठी झेप)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)