ICC क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड सामना खेळला केला. जो 29 ऑक्टोबर रोजी खेळला गेला. या सामन्यावेळी पहिल्या डावात फलंदाजी करत असताना रवींद्र जडेजा याच्या बॅटवर 'मारवाडी स्टॅलियन' चिन्ह दिसले. डावाच्या 38 व्या षटकात फलंदाजी करताना जडेजा याच्या बॅटवर असलेले हे चिन्ह कॅमेऱ्यांनी टीपले. या चिन्हात घोड्याच्या चेहऱ्याचा पुढचा भाग आहे आणि खाली 'मारवाडी स्टॅलियन' लिहिलेले आहे. वाचकांच्या माहितीसाठी असे की, जडेजाला घोडे आवडतात आणि मारवाडी ही राजस्थानच्या जोधपूर भागातील घोड्यांची एक जात आहे. एका जुन्या चित्रात तो त्याच्या बॅटवरील चिन्हाकडे निर्देश करताना दिसला होता.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)