U19 World Cup 2024 Schedule: आयसीसीने (ICC) सोमवारी पुढील वर्षी होणाऱ्या 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत आयोजित केली जाणार आहे. यामध्ये भारतासह एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे. तर अंतिम सामना 11 फेब्रुवारीला होणार आहे. 12 फेब्रुवारी हा दिवस अंतिम सामन्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेत टीम इंडिया 20 जानेवारीला बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. भारताला अ गटात बांगलादेश, आयर्लंड आणि यूएसए सोबत ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण 41 सामने होणार आहेत. साखळी टप्प्यात संघ त्यांच्या गटातील संघांसोबत 1-1 सामने खेळतील. त्यानंतर गट अ आणि ड, गट ब आणि क यांच्यातील सुपर-6 सामने वेगळे असतील. शेवटी, प्रत्येक सुपर-6 मधून 2-2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीतील विजयी संघ 11 फेब्रुवारीला अंतिम फेरीत आमनेसामने येतील. (हे देखील वाचा: England Test Team For India Announced: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडने संघ केला जाहीर, या खेळाडूंना मिळाले स्थान)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)