आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2024 अंतिम सामना 29 जून रोजी खेळला गेला. या सामन्यात भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा सात धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषक विजेतेपदावर कब्जा केला आहे. टीम इंडियाचे मायदेशात भारतात जंगी स्वागत करण्यात आले. टीम इंडिया आज सकाळी 6.09 वाजता दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. एअरपोर्टवरून टीम इंडिया थेट हॉटेलमध्ये पोहोचली. यानंतर टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचली. आता जल्लोषाचा पुढचा कार्यक्रम मुंबईत होणार आहे. जिथे भारतीय संघ ओपनडेक बसमधून विजयी मिरवणूक काढेल. टीम इंडिया नरीमन पॉईंट ते वानखेडेपर्यंत ओपनडेक बसमधून संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत विजयी मिरवणूक काढणार आहे. यानंतर वानखेडे येथे छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. संध्याकाळी 5.00 वाजल्यापासून स्टार स्पोर्ट्स संपूर्ण विजय परेडचे थेट प्रक्षेपण करेल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)