RCB vs GT: पावसाने वाढवली आरसीबीची चिंता, गुजरातविरुद्धचा सामना रद्द होण्याची शक्यता
प्लेऑफमध्ये समावेश होण्यासाठी आरसीबीला हा सामना जिंकणे फार गरजेचे आहे. परंतू या सामन्याच्या वेळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे आता आरसीबीची चिंता वाढली आहे.
आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि गतविजेता गुजरात टायटन्स (Gujrat Titans) यांच्यात रंगणार आहे. हा सामना बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. प्लेऑफमध्ये समावेश होण्यासाठी आरसीबीला हा सामना जिंकणे फार गरजेचे आहे. परंतू या सामन्याच्या वेळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे आता आरसीबीची चिंता वाढली आहे. जर पावसामुळे हा सामना रद्द झाला तर आरसीबीला 1 गुण प्राप्त होईल आणि जर आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय प्राप्त झाला तर आरसीबीची प्लेऑफची आशा संपुष्टात येतील.
Yes, it rained. It stopped. And it was business as usual an hour later. 🤷♂️#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2023 pic.twitter.com/oIKEvCm6ij
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 20, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 21, 2023 11:03 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

