विश्वचषक संघातून हार्दिक पांड्या याला धक्कादायकरित्या बाहेर पडावे लागले आहे. घोट्याच्या दुखापतीने पांड्याची विकेट घेतली. ज्यामुळे त्याच्यासह त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला. पांड्याचा भारतासोबतचा ICC क्रिकेट विश्वचषक 2023 चा प्रवास संपल्याने निराश झालेल्या पांड्याने आपल्या भावना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X द्वारे व्यक्त केल्या आहेत. त्याने आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, “विश्वचषकातील उर्वरित भाग मी गमावणार हे सत्य पचविणे कठीण आहे. प्रत्येक सामन्याच्या प्रत्येक चेंडूवर मी संघासोबत असेन, उत्साहाने त्यांचा जयजयकार करेन. सर्व शुभेच्छांबद्दल धन्यवाद. आपले प्रेम आणि समर्थन अविश्वसनीय आहे. टीम इंडिया खास आहे. मला विश्वास आहे की, आम्ही जिंकू शकतो.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)