इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 30वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लखनौचे होम ग्राऊंड भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. लखनौने यावर्षी चांगली कामगिरी केली आहे. लखनौ संघाने 6 पैकी 4 सामने जिंकले असून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, गुजरातने पाचपैकी तीन सामने जिंकले असून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर कायम आहे. दोन्ही संघांचा नेट रनरेट खूप चांगला आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्लेइंग इलेव्हनवर एक नजर:
लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, नवीन-उल-हक, अमित मिश्रा, आवेश खान, रवी बिश्नोई.
गुजरात टायटन्स: ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा.
🚨 Toss Update 🚨@gujarat_titans win the toss and elect to bat first against @LucknowIPL.
Follow the match ▶️ https://t.co/TtAH2CiXVI#TATAIPL | #LSGvGT pic.twitter.com/20T7s855If
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)