इंडियन प्रीमियर लीग 2023 चा (IPL 2023) दुसरा क्वालिफायर आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (GT vs MI) यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी (Ahmedabad's Narendra Modi Stadium) स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांना अंतिम फेरी गाठण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी करो किंवा मरो असा असेल. यामध्ये जो संघ जिंकेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल आणि चेन्नईसोबत खेळेल. पराभूत संघाचा प्रवास तिथेच संपेल. दरम्यान, मुंबईने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

गुजरात टायटन्स: शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी.

पर्याय: जोशुआ लिटल, ओडियन स्मिथ, आर साई किशोर, केएस भरत.

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पियुष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय.

पर्यायः नेहल वढेरा, रमणदीप सिंग, राघव गोयल, संदीप वारियर.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)