GT Vs MI IPL 2024 5th Match: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या 17 व्या हंगामातील 5 व्या सामन्यात रविवारी मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्सशी (MI vs GT) होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून हा सामना होणार आहे. हार्दिक पांड्या या सामन्यात आपल्या जुन्या फ्रँचायझीला हरवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. तसेच, हार्दिकच्या जाण्यानंतर शुभमन गिलकडे (Shubman Gill) गुजरात जायंट्सच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, तुम्ही हा सामना मोबाइलवर जियो सिनेमावर फ्रिमध्ये पाहू शकतात. तसेच, तुम्हाला आयपीएल टीव्हीवर बघायचे असेल तर तुम्ही ते स्टार स्पोर्ट्सवर पाहू शकता. आयपीएल समालोचन हिंदी, इंग्रजी तसेच प्रादेशिक भाषांमध्ये असेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)