लेजेंड्स लीग क्रिकेट (LLC 2022) मध्ये, गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील इंडिया कॅपिटल्सने (IND C) इरफान पठाणच्या नेतृत्वाखालील भिलवारा किंग्स (BK) चा पराभव करून LLC चे विजेतेपद पटकावले. रॉस टेलर (82) आणि मिचेल जॉन्सन (62) यांनी स्कोअरबोर्डवर 211 धावा लावल्या. प्रत्युत्तरात भिलवाडा किंग्जचा संघ अवघ्या 107 धावा करून सर्वबाद झाला. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भिलवाडा किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मॉन्टी पानेसर आणि राहुल शर्मा या जोडीने पहिल्या 5 षटकांत 4 बळी घेत हा निर्णय योग्य दाखवला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)