टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताला (IND vs ENG) 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. हा पराभव भारताला वर्षानुवर्षे डंखणार आहे. टीम इंडियाच्या या लाजिरवाण्या पराभवानंतर गौतम गंभीरला (Gautam Gambhir) महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधारपदाची आठवण येऊ लागली. या पराभवानंतर गंभीर स्टार स्पोर्ट्सवर म्हणाला, 'कोणीतरी येईल, जो कदाचित रोहित शर्मापेक्षा जास्त द्विशतक झळकावेल आणि विराट कोहलीपेक्षा जास्त शतके झळकावेल. पण कोणताही भारतीय कर्णधार तीन आयसीसी ट्रॉफी जिंकू शकेल असे मला वाटत नाही. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2007 टी-20 वर्ल्ड कप, 2011 वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)