आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) गौतम गंभीर त्याच्या जुन्या संघ कोलकाता नाईट रायडर्समध्ये (KKR) दिसणार आहे. गौतम गंभीर (Gautam Gambhir) आयपीएल 2022 आणि 2023 पर्यंत लखनौ सुपर जायंट्सशी मेंटॉर म्हणून संबंधित होता. आता गौतम गंभीर केकेआरचा मेंटर झाला आहे. आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी गौतम गंभीरने कोलकाता नाइट रायडर्सच्या थिंक टँक बैठकीचे नेतृत्व केले. केकेआरच्या थिंक टँक बैठकीत गौतम गंभीर व्यतिरिक्त मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित, सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर आणि व्यवस्थापकीय संचालक वेंकी म्हैसूर देखील उपस्थित होते. (हे देखील वाचा: IPL Auction 2024: आयपीएलच्या मिनी लिलाव मंगळवारी होणार दुबईत, भारताच्या 'या' 5 खेळाडूंवर असणार सर्वाच्या नजरा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)