Pele Dies at 82: सर्व काळातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेले पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले आहे. ते कोलन कॅन्सर तसेच हृदय आणि किडनीच्या समस्यांमुळे 29 नोव्हेंबरपासून रुग्णालयात उपचार घेत होते. सप्टेंबर 2021 मध्ये ते कर्करोगाशी झुंज देत असल्याचे त्यांनी उघड केले. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येपासून पेलेचे कुटुंब साओ पाउलोच्या रुग्णालयात त्याच्या पलंगाच्या भोवती जमले होते. पेले यांनी आपल्या देशाला ब्राझीलला तीन वेळा विश्वविजेता बनवले. त्यांच्या नेतृत्वाखाली ब्राझीलने 1958, 1962 आणि 1970 मध्ये विश्वचषक जिंकला होता. 1958 च्या विश्वचषक फायनलमध्ये सुदान विरुद्ध दोन गोल केले. पेले यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत एकूण 1363 सामने खेळले आणि 1281 गोल केले. त्यांनी ब्राझीलसाठी 91 सामन्यात 77 गोल केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)