विश्वचषक 2023 चा 21 वा सामना टीम इंडिया आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात धर्मशाला येथे खेळला गेला. या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने 20 वर्षांनंतर आयसीसी टूर्नामेंटमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला आहे. टीम इंडियाने या सामन्यात चार विकेट्सने धुव्वा उडवला. यासह टीम इंडियाने न्यूझीलंडच्या विजयी रथालाही ब्रेक लावला आहे. याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडचा संपूर्ण संघ निर्धारित 50 षटकात 273 धावा करू शकला. न्यूझीलंडसाठी डॅरिल मिशेलने 130 धावांची शानदार खेळी केली. टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाने 47.5 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियासाठी स्टार फलंदाज विराट कोहलीने सर्वाधिक 95 धावांची सामना जिंकणारी खेळी खेळली. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक दोन बळी घेतले. टीम इंडियाचा पुढचा सामना लखनौमध्ये 29 ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्ध होणार आहे.
CWC2023. India Won by 4 Wicket(s) https://t.co/MrCP495zvG #INDvNZ #CWC23
— BCCI (@BCCI) October 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)