Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team 3rd T20I Match: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 86 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनने झंझावाती अर्धशतक ठोकले आहे. त्याने 22 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचे टी-20 कारकिर्दीतील हे तिसरे अर्धशतक आहे.
End of Powerplay!
A power-packed start from #TeamIndia as they move to 82/1 🔥🔥
FIFTY partnership comes 🆙 for the second wicket 🤝
Live - https://t.co/ldfcwtHGSC#INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/1iNpUMNvuE
— BCCI (@BCCI) October 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)