IND vs ENG 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. चौथ्या दिवसाचा खेळाला सकाळी साडेनऊ वाजता सुरूवाच झाली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंड संघाने 77 षटकांत 6 गडी गमावून 316 धावा केल्या होत्या. इंग्लंड संघाने 126 धावांची आघाडी घेतली आहे. ओली पोप झळकावून खेळत आहे. तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा संपूर्ण संघ 64.3 षटकांत केवळ 246 धावा करू शकला. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 70 धावा केल्या. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा आणि आर अश्विनने प्रत्येकी सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाचा डाव 121 षटकात 436 धावांवरच मर्यादित राहिला. टीम इंडियाने 190 धावांची आघाडी घेतली होती. टीम इंडियासाठी अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाने सर्वाधिक 87 धावा केल्या. इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. दरम्यान, दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाला सातवा धक्का बसला आहे. इंग्लडचा स्कोर 339/7
1ST Test. WICKET! 82.3: Rehan Ahmed 28(53) ct Srikar Bharat b Jasprit Bumrah, England 339/7 https://t.co/HGTxXf8b1E #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) January 28, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)