भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. बुधवारी या मैदानावरील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता. या मालिकेत इंग्लंड 1-0 ने आघाडीवर आहे. जर टीम इंडिया हा सामना हरली तर ती मालिका गमावेल. अशा परिस्थितीत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली संघ पुनरागमनाकडे डोळे लावून बसला आहे. दरम्यान, इंग्लंडची कर्णधार हीदर नाइटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

भारत: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, पूजा वस्त्राकर, तितास साधू, रेणुका ठाकूर सिंग, सायका इशाक.

इंग्लंड: सोफिया डंकले, डॅनिएल व्याट, अॅलिस कॅप्सी, नताली सीव्हर ब्रंट, हेदर नाइट (कर्णधार), एमी जोन्स (विकेटकीपर), फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)