IND vs ENG 1st Test: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून म्हणजेच 25 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. सामन्याला सकाळी साडेनऊ वाजता सुरुवात होइल. दोन्ही संघ पुढील दीड महिना या कसोटी मालिकेत व्यस्त असतील. येथे इंग्लंड संघ आपल्या बेसबॉल शैलीने टीम इंडियाच्या मजबूत घरच्या कसोटी विक्रमाला आव्हान देईल. अशा परिस्थितीत प्रत्येक क्रिकेट चाहता या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान, इंग्लडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड, जॅक लीच

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)