सध्या माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी काल्हेर, भिवंडी च्या आकृती हॉस्पिटल मध्ये प्रकृती खालावल्याने दाखल झाल्यानंतर त्याच्या मेंदूमध्ये गाठीची आणि युरिन इंफेक्शनच्या तक्रारीवर उपचार सुरू आहेत. अतिदक्षता विभागात असलेल्या विनोद कांबळीला उपचारांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 लाखांची मदत केली आहे. ही मदत श्रीकांत शिंदे फाऊंडेशन कडून करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आज मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील आकृती हॉस्पिटल मध्ये जाऊन विनोद कांबळीची भेट घेत त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. Vinod Kambli Health Update: विनोद कांबळी च्या मेंदूमध्ये गाठींचं निदान .
प्रताप सरनाईकांकडून विनोद कांबळीची विचारपूस
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)