भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सुपर फोर सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. रविवारी खेळ पूर्ण होऊ शकला नाही म्हणु आज हा संपुर्ण सामना खेळवण्यात येत आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने पाकिस्तान समोर 357 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. पावसामुळे या सामन्यासाठी एसीसीने आधीच राखीव दिवस निश्चित केला होता. अशा स्थितीत हा सामना आज पूर्ण होणार आहे. पावासामुळे दुपारी 4.40 वाजता सामना सुरू झाला भारताने 24.1 षटकांपासून खेळण्यास सुरुवात झाली आणि भारताने पाकिस्तान समोर 357 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडू विराट कोहली आणि केएल राहुने शतक ठोकले आहे तर कर्णधार रोहित शर्मा आणि शुमभन गिलने अर्धशतक झळकावले आहे. लक्ष्याचा पाठलाग करत पाकिस्तानने आपली तिसरी विकेट गमावली आहे. तत्तपुर्वी पावसाच्या विश्रांती दरम्यान मैदानात प्रेक्षकांची हाणामारी पाहायला मिळाली ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पहा व्हिडिओ
Meanwhile at RPS during the rain break 🙆♀️ #AsiaCup23 #PAKvIND pic.twitter.com/xLb8esToOg
— Nibraz Ramzan (@nibraz88cricket) September 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)