भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने (Surya Kumar Yadav) आपला सुरेख फॉर्म कायम ठेवत न्यूझीलंडविरुद्धच्या (IND vs NZ) दुसऱ्या T20 सामन्यात शानदार शतक झळकावले. सूर्यकुमार यादवच्या कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मधील दुसरे शतक आहे. माउंट मौनगानुई येथे खेळल्या गेलेल्या या डावात त्याने 51 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या ज्यात 11 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीने चाहत्यांसह क्रिकेटरसिकांचीही मने जिंकली. सूर्याच्या या खेळीनंतर यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतची (Rishabh Pant) प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)