अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकची (Dinesh Karthik) पुन्हा एकदा T20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) भारतीय संघात निवड झाली आहे. 2007 मध्ये झालेल्या पहिल्या T20 विश्वचषकातही तो भारतीय संघाचा भाग होता. आयपीएल 2022 मध्ये दमदार खेळामुळे त्याने यावर्षी पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवले आणि आता त्याची टी-20 वर्ल्ड कपमध्येही निवड झाली आहे. ICC T20 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून DK ला त्यात स्थान मिळाले आहे. संघात निवड झाल्यानंतर डीकेची प्रतिक्रिया हे आजचे सर्वोत्तम ट्विट आहे. तो म्हणाला, हो स्वप्न पूर्ण होतात! (Dreams do come true) असं भावनिक ट्वीट केलं आहे. तसेच अष्टपैलू हार्दिक पांड्याने त्याच्या ट्विटवर हृदय पिळवटून टाकणारे उत्तर दिले आहे. एका शब्दाने पांड्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)