ऋषभ पंत आणि अक्षर पटेलने 113 धावांची भागीदारी रचल्यानंतर शेवटच्या काही ओव्हरमध्ये पंतने चांगलेच शॉट मारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पंतने मोहित शर्माच्या शेवटच्या षटकात तब्बल 31 धावा ठोकून दिल्लीला 20 षटकात 4 बाद 224 धावांपर्यंत पोहचवलं. पंतने 43 चेंडूत 88 धावांची तर स्टब्सने 7 चेंडूत 26 धावा चोपल्या. संदीप वॉरियरनं दिल्लला तीन धक्के दिल्यानंतर ऋषभ पंत आणि अक्षर पटेल या दोघांनी भागीदारी रचत दिल्लीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
पाहा पोस्ट -
Delhi Capitals registered a mammoth total on the board.
Can GT chase it down?#RishabhPant #AxarPatel #TristanStubbs #MohitSharma #DCvGT #DCvsGT #IPL2024 #IPL #Cricket #SBM pic.twitter.com/p7Rs4XXFaS
— SBM Cricket (@Sbettingmarkets) April 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)