IND vs ENG 4th Test Day 3: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्याला (IND vs ENG 4th Test) शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. हा सामना रांचीमध्ये खेळवला जात आहे आहे. भारतीय संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून अजेय आघाडी मिळवायची आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवसाचा खेळ सकाळी 9.30 वाजता सुरू होईल. दुस-या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने बिनबाद 219 धावा केल्या होत्या आणि कुलदीप यादव आणि ध्रुव जुरेल नाबाद माघारी परतले. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाने पहिल्या डावात 10 गडी गमावून 353 धावा केल्या. टीम इंडिया आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स-18 आणि कलर्स कॉम्प्लेक्स चॅनलवर उपलब्ध असेल. तुम्ही Jio Cinema ॲप आणि वेबसाइटवर पहिल्या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकाल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)