आयसीसी विश्वचषक 2023 च्या 18 व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात शुक्रवारी (20 ऑक्टोबर) बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK) याच्यात सामना खेळवला जात आहे. आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने अवघ्या 85 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यादरम्यान डेव्हिड वॉर्नरचा एक शॉटही व्हायरल झाला आहे. त्याने हारिस रौफकडून 145 किमी प्रतितास चेंडू टिपला आणि मिडविकेटवर षटकार मारला. आयसीसीने त्याच्या शॉटचा व्हिडिओही शेअर केला आहे. वॉर्नरचा हा शॉट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)