CSK vs RCB IPL 2021 Match 19: Suresh Raina ने ठोकलं षटकारांचं ‘द्विशतक’; रोहित, धोनी व विराटच्या ‘या’ खास यादीत मिळवले स्थान

चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्या सामन्यात मिस्टर आयपीएल म्हणून प्रसिद्ध सीएसकेच्या सुरेश रैनाने षटकारांचे दुहेरी शतक पूर्ण केले. अशी कमाल करणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी, रोहित शर्मा, महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहली यांनी आयपीएलमध्ये षटकारांचं ‘द्विशतक’ ठोकले आहेत.

CSK vs RCB IPL 2021 Match 19: Suresh Raina ने ठोकलं षटकारांचं ‘द्विशतक’; रोहित, धोनी व विराटच्या ‘या’ खास यादीत मिळवले स्थान
चेन्नई सुपर किंग्सचा सुरेश रैना (Photo Credit: Twitter/@IPL)

CSK vs RCB IPL 2021 Match 19: चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात आयपीएल 2021 चा 19 वा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात ‘Mr IPL’ म्हणून प्रसिद्ध सीएसकेच्या  (CSK) सुरेश रैनाने (Suresh Raina) षटकारांचे दुहेरी शतक पूर्ण केले. भारताच्या प्रतिष्ठित लीगमध्ये अशी कमाल करणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. रैनाआधी भारतीय खेळाडूंमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma, महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी आयपीएलमध्ये षटकारांचं ‘द्विशतक’ ठोकले आहेत. रोहितने आयपीएलमध्ये आजवर सर्वाधिक 222 सिक्स खेचले आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 25, 2021 04:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).