कोलकाता पोलिसांनी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (CAB) अध्यक्ष स्नेहशिष गंगोपाध्याय यांना विश्वचषकाच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी समन्स पाठवले आहे. स्नेहाशिष हे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांचे भाऊ आहेत. कोलकाता पोलिसांनी त्यांना 24 तासांत हजर राहण्यास सांगितले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 3 नोव्हेंबरपर्यंत तिकिटांचा काळाबाजार केल्याच्या आरोपाखाली सात गुन्हे दाखल करण्यात आले असून 16 जणांना अटक करण्यात आली आहे. स्नेहाशिष यांना 2 नोव्हेंबरला नोटीस पाठवली होती.

इंडियन एक्स्प्रेसच्या प्रतिनिधी स्वीटी कुमारीच्या वृत्तानुसार, 2 नोव्हेंबर रोजी कोलकाता पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी BookMyShow ला समन्स पाठवले होते. BookMyShow हे पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अधिकृत तिकीट भागीदार आहे. ईडन गार्डन्सवर 5 नोव्हेंबरला होणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याबाबतचे 94 तिकिटे जप्त केली आहेत. हे 900 रुपयांचे तिकीट 8 हजार रुपयांना विकले जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. (हेही वाचा: IPL 2024: फुटबॉलनंतर आता सौदी अरेबिया आयपीएलमध्ये करणार गुंतवणूक - अहवाल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)