Ben Stokes in County Championship: बेन स्टोक्सला (Ben Stokes) नुकतेच इंग्लंडच्या कसोटी संघाचा (England Test Team) नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. जूनमध्ये आपल्या संघाची जबाबदारी सांभाळले आहे. पण, त्याआधी तो IPL सोडून काउंटी चॅम्पियनशिपच्या (County Championship) तयारीत गुंतला आहे. स्टोक्सने काउंटीमध्ये खेळताना सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर केला आहे. काउंटी चॅम्पियनशिपमध्ये डरहम (Durham) कडून खेळताना स्टोक्सने शुक्रवारी शानदार शतक झळकावले. एवढेच नाही तर त्याने एका ओव्हरमध्ये सलग 5 चेंडूत 5 षटकार मारून एकूण 34 धावा काढल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)