Fazalhaq Farooqi Mankading Shadab Khan: मंकडिंग (Mankading) हा क्रिकेटचा एक पैलू आहे ज्याने जेव्हा जेव्हा प्रयत्न केला जातो तेव्हा चर्चेला उधाण येते. क्रिकेटची सर्वोच्च संस्था असलेल्या आयसीसीने मंकडिंगला योग्य ठरवले असले, तरी 'स्पिरिट ऑफ द गेम' ही बाब नेहमीच चर्चेत राहिली आहे. गुरुवारी हंबनटोटा येथे खेळल्या गेलेल्या अफगाणिस्तान-पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात असेच दृश्य समोर आले. त्याचं झालं असं की, 301 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला पाकिस्तानचा संघ हा सामना जिंकण्यासाठी कसा तरी धडपडत होता. पाकिस्तानला विजयासाठी 6 चेंडूत 11 धावांची गरज होती. हा सामना शादाब जिंकवेल असे वाटत होते. दरम्यान, अफगाणिस्तानचा गोलंदाज फजलहक फारुकी शेवटच्या षटकाचा पहिला चेंडू टाकण्यासाठी आला तेव्हा त्याला शदाब क्रीज सोडताना दिसला. ते पाहून फारुकीला मंकडिंगमधून धावबाद होण्याची संधी मिळाली. शादाब बाहेर येताच त्यांनी लगेच दांड्या उडवल्या. शादाबही विलंब न लावता पॅव्हेलियनमध्ये परतला आणि आता पुन्हा हा वाद पेटला आहे.
पहा व्हिडिओ
A run out at the non striker's end by Fazalhaq Farooqui. pic.twitter.com/gKGuMIMJN0
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)