PAK vs AFG 2nd ODI Highlights: नसीम शाहचा पुन्हा धमाका, अफगाणिस्तानच्या जबड्यातून विजय हिसकावला; पहा शेवटच्या षटकाचा थरार (Watch Video)
301 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला शेवटच्या षटकात 6 चेंडूत 11 धावांची गरज होती. शादाब खान उत्कृष्ट खेळात होता पण तो बाद झाल्यानंतर नसीम शाहने सामना फिरवला आणि अफगाणिस्तानच्या जबड्यातून विजय हिसकावला.
Pakistan Beat Afghanistan: पाकिस्तानचा खेळाडू नसीम शाहने (Naseem Shah) पुन्हा धमाका केला आहे. गुरुवारी हंबनटोटा येथे खेळल्या गेलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नसीम फिनिशर म्हणून उदयास आला. त्याने पाचव्या चेंडूवर चौकार मारून अफगाणिस्तानच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला. खालच्या क्रमावर नसीमच्या स्फोटक फलंदाजीमुळे पाकिस्तानने 1 चेंडू शिल्लक असताना 1 गडी राखून सामना जिंकला. या सामन्यातील शेवटचे षटक अतिशय रोमांचक होते. 301 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला शेवटच्या षटकात 6 चेंडूत 11 धावांची गरज होती. शादाब खान उत्कृष्ट खेळात होता पण तो बाद झाल्यानंतर नसीम शाहने सामना फिरवला आणि अफगाणिस्तानच्या जबड्यातून विजय हिसकावला.
पहा व्हिडिओ
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 25, 2023 09:09 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

