टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज ग्वाल्हेरमध्ये खेळला गेला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पराभवानंतरही श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका खेळपट्टीवर उभा राहिला आणि लढत राहिला. या सामन्यामध्ये त्याने जबरदस्त शतकही झळकावले. या दरम्यान, शनाकाला आपले शतक पुर्ण करण्यासाठी अखेरच्या षटकात काही धावांची गरज होती पण वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने दासुन शनाकाला मंकडिंग बाद केले. त्यानंतर रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आऊट बॅट्समनला नॉन-स्ट्राइकिंग एंडला खेळण्याची परवानगी दिली आणि अंपायरकडून अपील मागे घेतले आणि फलंदाज शनाका सुरक्षित क्रीजवर राहिला. यानंतर शनाकाने आपले शतक पुर्ण केले पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देवु शकला नाही. रोहितने घेतलेल्या या निर्णयामुळे सगळे चाहते त्याचे कौतुक करत आहे.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)