Cheteshwar Pujara vs Shaheen Afridi: भारत (India) आणि पाकिस्तानच्या (Pakistan) चाहत्यांना या दोन देशांमधील रेड बॉल क्रिकेट पाहायचं असतं. काउंटी क्रिकेटमध्ये (County Cricket) भारताचा चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) आमनेसामने आल्याने चाहत्यांमध्ये काहीसे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पुजाराचा काउंटी क्रिकेटमध्ये धुमाकूळ सुरूच आहे. आत्तापर्यंत तीन सामन्यांमध्ये पुजाराने 132.75 च्या सरासरीने 531 धावा केल्या आहेत. पुजारा मिडलसेक्स (Middlesex) विरुद्ध चौथा सामना खेळत असून यादरम्यान त्याचा सामना पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीशी झाला. आणि पुजाराने आफ्रिदीच्या वेगवान चेंडूवर अप्पर कट शॉटच्या मदतीने षटकार ठोकला. पुजारा आणि शाहीन आफ्रिदीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)