वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली. यामध्ये एकीकडे अनेक युवा खेळाडूंना स्थान देण्यात आले, तर दुसरीकडे अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पुजाराच्या वगळल्यानंतर एकीकडे त्याची कारकीर्द संपुष्टात आल्याच्या चर्चा होत आहेत, तर दुसरीकडे या अनुभवी फलंदाजाने कसोटी संघात पुनरागमन करण्याची तयारी सुरू केली आहे. कसोटी संघातून वगळल्यानंतर चेतेश्वर पुजारा पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. तो दुलीप ट्रॉफीमध्ये दक्षिण विभागाकडून खेळू शकतो. वृत्तानुसार, पुजाराला व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे की, त्याने डोमेस्टिक सर्किटमध्ये चांगली कामगिरी केली तरच त्याच्या पुनरागमनाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत त्यांनी यासाठी तयारी सुरू केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)