इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 60 वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात 27 वेळा सामना झाला आहे, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने 18 आणि कोलकाता नाईट रायडर्सने केवळ 9 वेळा विजय मिळवला आहे. त्याचवेळी या दोघांमधील आजचा सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. येथे दोन्ही संघ 9 वेळा भिडले आहेत, ज्यात सीएसके 7 आणि केकेआर ने फक्त 2 जिंकले आहेत. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करत चेन्नईने कोलकाता समोर ठेवले 145 धावाचे लक्ष्य.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)