इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 60 वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या शेवटच्या षटकात रवींद्र जडेजा आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतत होता आणि दुसऱ्या बाजूने कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) मैदानात उतरणार होता. यावेळी संपूर्ण स्टेडियम माहीच्या समर्थनार्थ गुंजले. खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये फक्त चेन्नई सुपर किंग्जची जर्सी दिसत होती. संपूर्ण स्टँड पिवळ्या रंगात रंगलेला दिसत होता. हा प्रचंड पाठिंबा पाहून महेंद्रसिंग धोनी भावूक झाला.
पहा व्हिडिओ
Cue the awesome noise as Thala enters Chepauk 🥳 #CSKvKKR #TATAIPL #IPL2023 #IPLonJioCinema #EveryGameMatters | @ChennaiIPL pic.twitter.com/Z7iB1EihcT
— JioCinema (@JioCinema) May 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)