IND vs ENG 2nd Test Day 2: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्याला (IND vs ENg 2nd Test) शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे. हा सामना विशाखापट्टणम येथे खेळवला जात आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. 9.30 वाजता आजच्या सामन्याला सरुवात झाली आहे. पहिल्या डावात पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या 336/6 अशी होती. तत्तपुर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रोहित-गिल-श्रेयस अय्यर हे पुन्हा फ्लाप ठरले त्यांनी आपल्या स्वस्तात विकेट गमावल्या. दरम्यान, दुसऱ्या दिवशी भारताने यशस्वी जैस्वालच्या द्विशतकामुळे पहिल्या डावात 396 धावा केल्या. यशस्वी जैस्वाल 290 चेंडूत 209 धावा करून बाद झाला आहे. त्याने आपल्या खेळीत 19 चौकार आणि सात षटकार मारले. दरम्यान, फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाला पाचवा धक्का लागला आहे. इंग्लडचा स्कोर 159/5
Bumrah breathing 🔥!
He picks his 3⃣rd wicket! 👏 👏
A good low catch @ShubmanGill as Jonny Bairstow gets out. 👌 👌
Follow the match ▶️ https://t.co/X85JZGt0EV #TeamIndia | #INDvENG | @Jaspritbumrah93 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/K3mUzDKMXw
— BCCI (@BCCI) February 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)