Pakistan National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (Pakistan National Cricket Team) आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यात उद्यापासून म्हणजेच 29 ऑगस्टपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी खेळवली जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना रावळपिंडी येथील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता खेळवला जाईल. पहिल्या कसोटीत बांगलादेश संघाने पाकिस्तानचा 10 विकेट्सने पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार एक मोठी बातमी समोर येत आहे. ड्रेसिंग रुममध्ये शाहीन आफ्रिदी आणि शान मसूद यांच्यात हाणामारी झाली आहे. रिझवान हा भांडण संपवण्यासाठी तिथे गेला होता, मात्र त्यानंतर शाहीन आणि मसूदने मोहम्मद रिझवानला बेदम मारहाण केली. आज पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकानेही शाहीन आफ्रिदी बांगलादेशविरुद्ध पुढील कसोटी सामना खेळणार नसल्याचे पुष्टी केली.
Shaheen Afridi and Shan Masood had a physical fight in dressing room. Rizwan tried to sort it out and they started beating him too.
-Black Day for Pakistan Cricket pic.twitter.com/47EZhMmDL8
— mufaddla parody (@mufaddl_parody) August 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)