नुकतेच आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सने फायनलमध्ये गुजरात टायटन्सवर विजय मिळवून विक्रमी पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर तामिळनाडू भाजपचे प्रमुख अन्नामलाई यांनी दावा केला की, चेन्नई सुपर किंग्सच्या 'भाजप कार्यकर्ता' रवींद्र जडेजामुळे संघाने आयपीएल 2023ची अंतिम फेरी जिंकली. अन्नामलाई यांनी दावा केला रवींद्र जडेजा हा भाजप कार्यकर्ता आहे. अन्नामलाई यांनी आपल्या पोस्टमध्ये जडेजा आणि त्याची पत्नी रिवाबा यांचा भाजप पदाधिकारी म्हणून उल्लेख केला. यासह एका वृत्त वाहिन्याच्या मुलाखतीमध्ये त्यांनी जडेजा भाजप कार्यकर्ता असल्याचे सांगितले. सोमवारी रात्री पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा पाच गडी राखून पराभव करून चेन्नई सुपर किंग्ज पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनले. (हेही वाचा: आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने तिरुपती मंदिरात केली विशेष पूजा, Watch Video)

Tamil Nadu BJP chief Annamalai says BJP worker Jadeja helped CSK win. 🤡🤡 pic.twitter.com/JvLqg3SFZN

बनले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)