आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 36 वा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथे खेळला जात आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार जॉट बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेला संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ 49.3 षटकांत 286 धावा करून सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियासाठी स्टार फलंदाज मार्नस लॅबुशेनने 71 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंड संघाला 50 षटकात 287 धावा करायच्या आहेत. या दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा दमदार खेळाडू मिच मार्श उद्या संध्याकाळी मुंबईत पुन्हा ऑस्ट्रेलियन संघात सामील होणार आहे. मिचेल मार्श वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतला होता पंरतु आता तो लवकरच संघात दाखल होणार आहे.
Mitch Marsh will re-join the Australian squad in Mumbai tomorrow evening #CWC23
— cricket.com.au (@cricketcomau) November 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)