Wanindu Hasaranga: विश्वचषक 2023 पासून श्रीलंकेच्या संघात आणि बोर्डात अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. आता कर्णधाराबाबत श्रीलंकेच्या संघात मोठा बदल झाला आहे. वृत्तानुसार, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आता टी-20 संघाची कमान वानिंदू हसरंगाकडे (Wanindu Hasaranga) सोपवली आहे. म्हणजेच दासुन शनाका आता श्रीलंकेच्या टी-20 संघाचा कर्णधार नसून, वानिंदू हसरंगा संघाची कमान संभाळताना दिसणार आहे. आयपीएल 2024 च्या (IPL 2024) लिलावापूर्वी हसरंगाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सोडले होते, त्यानंतर आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. याशिवाय वानिंदू हसरंगा आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसणार आहे. (हे देखील वाचा: IND vs SA 2nd Test: दुसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजाचं पुनरागमन! कोणता खेळाडू जाणार बाहेर? मोठा प्रश्न)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)