टीम इंडियाचा ऑफस्पिनर आर. अश्विनची (R Ashwin) वर्ल्ड कप 2023 (ICC Cricket World Cup 2023) साठी टीम इंडियामध्ये (Team India) एन्ट्री निश्चित झाली आहे. तर अक्षर पटेल (Axar Patel) दुखापतीमुळे बाहेर राहणार आहे. मात्र, अश्विन आणि अक्षर यांच्याबाबत बीसीसीआयकडून (BCCI) अद्याप कोणतेही अधिकृत अपडेट आलेले नाही. तर आयसीसीने (ICC) या बद्दल अपडेट दिले आहे. तसेच, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 30 सप्टेंबरला इंग्लंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळणार आहे. त्यामुळे भारतीय संघ आज गुवाहाटीला पोहचला यामध्ये आर. अश्विनही संघामध्ये दिसुन आला तर डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल टीम इंडियासोबत दिसला नाही.
🚨 BREAKING: India make late change to #CWC23 squad with all-rounder set to miss out due to injury!
Details 👇https://t.co/oa6htByQmz
— ICC (@ICC) September 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)