PBKS vs RCB, IPL 2024: आयपीएल 2024 चा 58 वा (IPL 2024) सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs PBKS) यांच्यात धर्मशाला येथील एचपीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात आरसीबीने पंजाबचा 60 धावांनी पराभव केला असुन आयपीएल 2024 मधून पंजाब बाहेर पडला आहे. तत्तपुर्वी, पंजाब किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या आरसीबीने पंजाबसमोर 242 धावांचे लक्ष्य ठेवले. आरसीबीकडून विराट कोहलीने सर्वाधिक 92 धावा केल्या. तर, दुसरीकडे पंजाबकडून हर्षल पटेल सर्वाधिक तीन विकेट घेतल्या आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबचा संघ 16.6 व्या षटकात गारद झाला. पंजाब किंग्जसाठी फलंदाज रिले रोसोने सर्वाधिक 61 धावांची खेळी खेळली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक तीन बळी घेतले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)