वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या सदस्यांनी येथे महान क्रिकेटपटू सर गारफिल्ड सोबर्स यांची भेट घेतली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 12 जुलैपासून डॉमिनिका आणि पोर्ट ऑफ स्पेन येथे दोन कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातील. बीसीसीआयने (BCCI) वेस्ट इंडिजच्या माजी कर्णधारासोबतच्या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. क्रिकेटच्या सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक असलेल्या 86 वर्षीय सोबर्सने 93 कसोटीत 8032 धावा केल्या आणि 235 विकेट्सही घेतल्या. रोहित, विराट कोहली, शुबमन गिल, रविचंद्रन अश्विन आणि भारतीय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे सोबर्स यांना भेटले होते. वेस्ट इंडिजचा हा महान खेळाडू त्याच्या पत्नीसोबत होता.
पहा व्हिडिओ
In Barbados & in the company of greatness! 🫡 🫡#TeamIndia meet one of the greatest of the game - Sir Garfield Sobers 🙌 🙌#WIvIND pic.twitter.com/f2u1sbtRmP
— BCCI (@BCCI) July 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)