आशिया चषकाच्या (Asia Cup 2023) सुपर फोरमधील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ 15 सप्टेंबरला बांगलादेशशी भिडणार (IND vs BAN) आहे. हा सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जात आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध सुपर 4 सामने जिंकल्यानंतर, रोहित शर्माच्या संघाने आशिया चषक 2023 च्या अंतिम फेरीत आधीच स्थान निश्चित केले आहे, तर बांगलादेश जेतेपदाच्या सामन्यात पोहोचण्याच्या शर्यतीतून बाहेर आहे. या सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राउंड-4 च्या शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये 5 बदल करण्यात आले आहेत. टिळक वर्माला (Tilak Verma) बांगलादेशविरुद्ध वनडे पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. ज्याबद्दल बीसीसीआयने टिळक यांचे ट्विट करून अभिनंदन केले. तुम्ही खालील ट्विट पाहू शकता.
All set for his ODI debut! 👌👌
Congratulations to Tilak Varma as he receives his #TeamIndia ODI cap from captain Rohit Sharma 👏 👏#AsiaCup2023 | #INDvBAN pic.twitter.com/kTwSEevAtn
— BCCI (@BCCI) September 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)