Buchi Babu Tournament 2024: भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या कसोटी मालिकेपूर्वी युवा फलंदाज शुभम खजुरियाचा (Shubham Khajuria) धमाका देशांतर्गत स्पर्धेत पाहायला मिळाला. जम्मू-काश्मीरचा फलंदाज शुभम खजुरियाने छत्तीसगडविरुद्ध द्विशतक झळकावले. शुभम खजुरियाने छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यात 202 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 368 चेंडूंचा सामना करत 17 चौकार आणि 08 षटकार ठोकले. त्याचे हे कारकिर्दीतील पहिले द्विशतक आहे. या खेळीसह जम्मू-काश्मीर संघाने छत्तीसगडच्या पहिल्या डावातील 278 धावांना प्रत्युत्तर देताना 200 हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे. 28 वर्षीय शुभम खजुरियाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप छाप पाडली आहे. त्याने 66 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 7 शतके आणि 11 अर्धशतकांसह 3634 धावा केल्या आहेत. तर लिस्ट ए मध्ये 66 सामन्यात 2136 धावा आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये पाच शतके आणि 12 अर्धशतके आहेत. त्याने 40 टी-20 सामन्यात 978 धावा केल्या आहेत.
#ShubhamKhajuria scores double ton while Sahil Lotra also hits a century as J&K piles up a huge lead of 209 runs against Chattisgarh in the first innings#BuchiBabu #Cricket pic.twitter.com/AROTjlsioP
— Kashmir Sports Watch (@Ksportswatch) August 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)