Pakistan National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (Pakistan National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस आज रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. चौथ्या दिवशी बांगलादेशचा संपूर्ण संघ पहिल्या डावात 565 धावांवर बाद झाल आहे. बांगलादेशचा अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज मुशफिकुर रहीमने 191 धावांची सर्वाधिक खेळी केली. आता पाहुणा संघ 117 धावांनी पुढे आहे. मुशफिकुर रहीमशिवाय शादमान इस्लामने 93 आणि मेहदी हसन मेराझने 77 धावा केल्या. पाकिस्तानकडून नसीम शाहने सर्वाधिक तीन बळी घेतले. नसीम शाह व्यतिरिक्त शाहीन आफ्रिदी, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अली यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तत्पूर्वी, पाकिस्तान संघाने 113 षटकांत 6 गडी गमावून 448 धावांवर डाव घोषित केला होता. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने 171 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली.
Bangladesh dig deep and take a nice lead - can they make something of this with just over a day to go?
It's also their highest total against Pakistan in Tests https://t.co/xz4BFLQVGD | #PAKvBAN pic.twitter.com/8JpC8a8KDZ
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)