Asian Games 2023: बांगलादेशने आशियाई क्रीडा 2023 च्या पुरुष क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या उपांत्यपूर्व फेरीत रोमहर्षक विजय नोंदवला. बांगलादेश संघाने मलेशियाचा 2 धावांनी पराभव केला. या विजयासह बांगलादेश संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. आता सेमीफायनलमध्ये बांगलादेशचा सामना भारताशी होणार आहे. आशियाई क्रीडा 2023 च्या उपांत्य फेरीत बांगलादेशचा संघ आता भारताशी भिडणार आहे. हा सामना 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.30 वाजता सुरू होईल. भारताने उपांत्यपूर्व फेरीत नेपाळला पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आमनेसामने आहेत. म्हणजेच भारत आणि पाकिस्तानने आपापले सामने जिंकले तर विश्वचषकाप्रमाणेच आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)