BAN Beat NED, 27th Match: टी-20 विश्वचषक 2024 चा 27 वा सामना (T20 World Cup 2024) आज बांगलादेश आणि नेदरलँड (BAN vs NED) यांच्यात सेंट व्हिन्सेंटच्या अर्नोस व्हॅले ग्राउंड, किंग्सटाउन येथे खेळला गेला. या रोमहर्षक सामन्यात बांगलादेशने नेदरलँड्सचा 25 धावांनी पराभव करत सुपर-8 मध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहे. तत्पूर्वी, नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर बांगलादेशच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 159 धावा केल्या. बांगलादेशसाठी, अनुभवी अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनने नाबाद 64 धावांची सर्वाधिक स्फोटक खेळी खेळली. नेदरलँड्सकडून आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या नेदरलँड संघाला 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 134 धावा करता आल्या. नेदरलँड्ससाठी सायब्रँड एंजेलब्रेक्टने सर्वाधिक 33 धावांची खेळी खेळली. बांगलादेशकडून रिशाद हुसैनने सर्वाधिक तीन बळी घेतले.
Netherlands were in it for a while there but Bangladesh proved too strong in the end 👊
👉 https://t.co/rOf8nMu79x | #BANvNED | #T20WorldCup pic.twitter.com/BcBg65Wojx
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 13, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)