पाकिस्तानी क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध (NZ vs PAK) पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) या मालिकेत चमकदार कामगिरी करत आहे. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावत आहे. चौथ्या एकदिवसीय सामन्यात त्याने मोठा विक्रम केला. त्याने दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला आणि भारताचा विराट कोहली (Virat Kohli) यांचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. बाबर आझमने न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात 19वी धावा पूर्ण करताच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील 5000 धावा पूर्ण केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 5000 धावा पूर्ण करणारा तो खेळाडू ठरला आहे. यासाठी त्याने 97 डाव खेळले आहेत.
Fastest to 5000 runs in ODI history – Another record broken by Baadshah Babar! 👑
Fastest batsmen to 5000 ODI runs (innings):
97 – Babar Azam 🇵🇰
101 – Hashim Amla 🇿🇦
114 – Viv Richards 🏝️
114 – Virat Kohli 🇮🇳
115 – David Warner 🇦🇺#PAKvNZ | #BabarAzam𓃵 pic.twitter.com/07KXEOVR7I
— Grassroots Cricket (@grassrootscric) May 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)