टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज खेळवला जात आहे. दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत. भारताने पहिला एकदिवसीय सामना पाच गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलिया संघाने दुसरा एकदिवसीय सामना 10 गडी राखून जिंकला. हा सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेपॉक, चेन्नई येथे खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णायक सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. टीम इंडियाने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला तिसरा मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर मिचेल मार्श 47 धावा करून हार्दिक पांड्याचा बळी ठरला. ऑस्ट्रेलिया संघाचा स्कोअर 85/3.
.@hardikpandya7 strikes once again and it's the big wicket of Mitchell Marsh who is bowled for 47 runs.
Live - https://t.co/eNLPoZpSfQ #INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/Nbpt2i91la
— BCCI (@BCCI) March 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)